निवडणुक

मंत्री रुपी गिधाडं पुन्हा दिसू लागलेत
मतं मिळविण्यासाठी सावज शोधू लागलेत
शरिरावर चढवून खादीचा बूरखा
बेशरम हे दाखवत आहे बघा पुळका

सत्ते साठि सारे हात मिळवणी करतात
सत्ता आलि कि सारे काही विसरतात
कुणि वाटटो आहे पैसे तर कुणि देतोय भाषणं
कधि होणार सुटका आपली कुणास ठाउक यातन

आता यांना राम रहिम सारे बघा आठवतात
मुद्दा बनवून त्याचा हे लोकांना बाटवतात
कुणि म्हणतोय आम्हिच आहोत मित्र तुमचे खरे
बाकि म्हणतात जाउ दे सारे डावेच आहेत बरे

स्वताह भोवती लावुन झेड ग्रेड सेक्युरिटी
देणार आहेत म्हणे हे पिसफूल लोकॅलिटी
खरं काय खोटं काय बरंच आपण जाणतो
तरी का मग नेहमी आपसात भांडतो

या वेळेला देण्याआधी मत करा विचार
बघू नका कोण कसा करतो आहे प्रचार
निवडणुकीच्या रिंगणात आहेत सारेच भ्रष्ट
निवडा त्याला ज्याच्या साठी हा देश श्रेष्ठ

वाट तिची

नेहमीच तिला पहायचो मी इथून जातांना
माळण्यासाठी केसात सुंदर गजरा घेतांना

गजरा घेउन हातात ती अलगद माळायची
तिची ती अदा मला नेहमिच भावायची

तिला रोज बघण्याचे वेड मला लागले
वाट पहात तिची माझे स्वप्नही जागले

मित्र मला तिचा वेडा म्हणू लागले
झलके साठी एका सारे काही त्यागले

ती मात्र यायची आणि जायची निघून
मी घ्यायचो उसासे नुसताच बघून

नंतर काही दिवस ती दिसेनासी झाली
गजरा घ्यायला आपल्या नवर्यासोबत आली