व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी...

व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी म्या पोरगी एक पटवली

सकाळी सकाळी गेलो म्या बस थांब्या वरती
सुंदर सुंदर पोरयाईची असते जिथे भरती

इकत घेतला होता गुलाब लाल चुटूक छान
मिथुन वानि दिसत व्हतं म्हाय एकूण ध्यान

लाल प्याटं हिरवा शर्ट गॉगल व्हता लावला
मले होता व्हॅलेंटाईन डे चा कीडा चावला

जाउन उभा राहिलो म्या जवळ एका पोरीच्या
सुंदर अश्या दिसणार्‍या त्या बघा गोरीच्या

दिलाची हो माझ्या अशी वाढली होती धक धक
बघत होतो तिच्या कडे सारखा म्या टक मक

पोरी बघून बाकी म्हाइ टर होत्या उडवत
बघतोय बघ तुलेच बोलून तिला होत्या चिडवत

म्हन्ल एवढी सुंदर हाय पटली तर नसल
बघुया चान्स मारून नेमच तर चुकल

कसा तरी आव आनुन म्हनलं तिले हल्लो
हाय तिने म्हणताच म्या उभ्या उभ्या मेलो

गुलाब देऊन म्हन्ल खूप प्रेम करीन तुझ्यावर
दिवस आज हाय प्रेमाचा नको नेऊस उदयावर

तिनं बी मग कबूल हाय म्हन्लं थोड लाजुन
इस्वास नाही बसत मले खरं सांगतो आजुन

मना सारखी म्हाया म्या पोरगी बघा गटवली
अन व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी म्या पोरगी एक पटवली

मुंबईचे भाई

फिरायला म्हणून गेलो मी मागे मुंबई
आपल्याला लई आवडले मुंबईचे भाई

मुंबईचे भाईंची स्टाईल एकदम न्यारी
हवेतच असते एकुण त्यांची स्वारी

तोंडामधे भरलेला खर्याचा तोबरा
हातावरती गोन्दलेला मोठासा कोबरा

बोलण्याची ढब त्यांची असते एकदम हटके
म्हण्तात प्रत्येक वाक्याला रेहना तुम बचके

आजु बाजुला असतात नेहमी चार दोन चेले
जमल नाही तर भाई सांगतो खोपचे मे लेले

बोलणं असत नेहमी यांच पेटी आणी खोक्याच
वागणं असत सरळ सोट अग्दी बिना डोक्याच

मामु लोकांन सोबत असते यांची जुनी दोस्ती
राडा करता जिरवतात ते पकडुन यांची मस्ती

अड्डा यांचा अस्तो एक कोपर्यावरची टपरी
करत असतात येता जाता बरीचशी लफडी

नसलं जरी काम काही दाखवतात हे घाई
अन आपल्याला लई आवडले मुंबईचे भाई

परथा

कसली येडी मानसं ही कुठली परथा धरत्यात
प्रेमाच्या नावा खाली बघा काही बाही करत्यात

याच दिवशी का यायीच सार ऊतू जातं परेम
आजच्या पोराईचा खरच नाही काही नेम

पोरगा म्हने पोरिला म्हाय प्रेम जिवापार
पोरगी म्हने आधिच जमलं उशीर केलास फार

पोर पोरी सोडा ईथ बायका बी हो भटकत्यात
नवर्याईच्या गळ्यात रस्त्यावरती लटकत्यात

आस वागून त्यासनी कुनास ठाऊक काय भेटतं
संस्क्रुतिची चाळणी पाहून रगत म्हाय पेटतं

व्हॅलेंटाईन डे....

फार पुर्वि होऊन गेला रोमन एक राजा
लग्न करता युवकांना तो द्यायचा सजा

त्याच काळात व्हॅलेंटाईन एक होता संत
चोरून लग्न लावण्याचे त्याचे होते तंत्र

राजाने मग काराग्रूहात त्याला केले बंद
त्याच्या केल्या क्रुतिंचा त्याला दिला दंड

जेलरच्या हो मुलिवर मग प्रेम त्याचे जडले
फासावरती जाण्याआधी बरेच काही घडले

मरण्या आधी त्याने लिहीली तिला एक ओळ
आणी तिथून सुरु झाला व्हॅलेंटाईन डे चा घोळ

पुतळा

गेली कित्येक वर्ष मी असाच ईथे आहे उभा
चालण्या फिरण्याची थोडी नाही मला मुभा

सारं काही मी माझ्या डोळ्यांनी या बघतो
ऊन पाउस वारा थंडी सारं काही सोसतो

सकाळी येऊन बसतात अंगावर माझ्या पक्षी
कपड्यांनवर ते माझ्या करून जातात नक्षी

आजुबाजुला माझ्या लावली आहेत झाडं त्यानी
एक म्हातारा रोज सकाळी त्यांना टाकतो पाणी

दिवस चढता दिसू लागतात माणसांचे लोंढे
सहन करतो दिवसभर मग गाड्यांचे मी भोंगे

भर उन्हात भाजुन निघते रोज माझी काया
डोक्यावरती छतरी बांधून देईल कोणी छाया

होते संध्याकाळ अजुन दिवस एक सरतो
आजु बाजुला माझ्या ठेल्यांचा मेळावा भरतो

एक वेडा रात्री रोज सोबतीला असतो माझ्या
झोपतो पायाशी फाटक्या चादरीवर त्याच्या

ओळख माझी मला ना माहीत इथे कुणा
मी आहे पार्क समोरचा पुतळा एक जुना

लव्ह स्टोरी

आज तुम्हाले सांगतो म्या म्हाई लव्ह स्टोरी
दिसली ही अन सोडलं म्या पहाणं दुसर्या पोरी

केलं परपोज तर म्हनली मले वाटत नाही लाज
पैताण खायची लै तुले सुटली हाय का खाज

म्या म्हनल येवढ्या पोरीत तुच आवडली मले
प्रेम म्हायं कबूल कर बसवीन डोक्यावर तुले

सकाळ दूपार सन्ध्याकाळ मंग हिच्याच मांग जाणं
झोपेत पन मंग हिचीच रोज सपान नवी पहानं

शेवटी हिले पटलं म्हाय प्रेम आहे खरं
तिनं बी मग म्हन्ल लाजून जमेल आपलं बरं

अशी बघा एकून हाय म्हायी लव्ह स्टोरी
दिसली ही अन सोडलं म्या पहाणं दुसर्या पोरी

ए. टी. एम

भेट माझी घेण्यासाठी असावं लागतं कार्ड
पैसे घेणं माझ्या कडून नाही जास्त हार्ड

आजकाल जागोजागी मी असतो हजार
सर्व गरजू लोकांची माझ्यावरती नजर

नाव जरी वेगळं तरी एकच आहे काम
मागाल तेंव्हा देतो मी तुम्हाला दाम

गरजू आपलं कार्ड माझ्या फटिमधे टाकतो
चेहर्यावरचे माझ्या काही नियम वाचतो

पुढे करतो नंतर मी पीन कोडच कोडं
चेक करण्या त्याला थांब म्हणतो थोडं

चुक झाली तीनदा तर कार्ड गिळुन टाकतो
चोरी करू नये कुणी म्हणुन असा वागतो

बरोबर असेल पिन तर पुढचा मेनु देतो
किती हवेत पैसे तुम्हाला हे विचारून घेतो

ओके असेल सारं तर मोजतो लगेच नोटा
सेवा माझी घेण्यात नाही काही तोटा

दुसर्या फटितून मी मग पैसे बाहेर टाकतो
भेदभाव न करता मी असाच नेहमी वागतो

मला भेट देणारा होतो नेहमी धनी
ए. टी. एम आहे मी मला वापरलाय ला तुम्ही

बलात्कार

उभी आहे ती कोर्टात मिळविण्यासाठी न्याय
अन्याय झालाय तिच्यावर दोष तिचा हो काय

बाप मेल्यावर लागली नोकरीत त्याचा जागी
घरी भावंडे दोन लहान आणी म्हातरी आजी

एकटं हेरून तीला त्याने साधला होता डाव
करून बलात्कार तिच्यावर दिला न बुझंणारा घाव

आरोपीच्या कठड्यात तो नराधम आहे उभा
पैसेवाल्यांना का असते काहिही करण्याची मुभा

वकिल मात्र तिलाच विचारतोय नेमकं काय घडलं
त्याने केलं सारं की तुमचं पाऊल वाकड पडलं

घडलेलं सारं काही ती ओरडुन ओरडुन सांगतेय
स्वातच आपली ईभ्रत ती वेशिवरती टांगतेय

आठवलं सारं की आजुनही लटपटतात तिचे पाय
मिळेल का तिला खरच तिच्या मनासारखा न्याय?

समजावुनी पीएम ला...

समजावुनी पीएम ला... (समजावुनी व्यथेला वर आधारीत)
सर्वांची माफी मागून सादर करतो आहे.

समजावुनी पीएम ला समजावता न आले
ईशुस दोन माझे रीसोल्व्ह नाही झालेत
समजावुनी पीएम ला...

डेट होती रीलीसची आली निघून गेली
डेमो क्लायंट ला त्या दाखवता ना आले
समजावुनी पीएम ला...

घेऊन काळजी ही सुटला तो बग माझा
कोडिंग असले माझे अंगाशी माझ्या आले
समजावुनी पीएम ला...

केले प्रयत्न मी ही चुका लपवण्याचे
पण ते ही सारे माझ्या कामात नाही आले
समजावुनी पीएम ला...

प्रेमपत्र

प्रेमपत्र लिहुन देणं हेच माझं काम
कॉलेजातल्या प्रत्येकाच्या तोंडी माझं नाव

सकाळ दुपार संध्याकाळ मी फक्त हेच करतो
एका हातात पेन अन दुसर्यात कागद धरतो

गरज अस्ते प्रत्येकाची वेगळी थोडी फार
मजकूर बाकी शब्दांचा वाढवतो भार

कुणी म्हण्तो तारे तोडील चंद्र म्हण्तो कुणी
कुणाला हवी असते मॉड कुणाला पोरगी गुणी

कुणाच्या मनात असते नकाराची भिती
तर कुणी करतो हिशोब की हिला भाऊ किती

कुणी नुसताच चान्स बघत असतो मारून
घुटमळत रहातो मागे पुढे ती येता समोरून

मी मात्र सारं काही हे नुसतच बसतो पहात
तिच्या विरहाचे आश्रु मना मधे वहात

कुणाचं काही जमताय का यासाठी मी धकतो
ती सोडुन गेल्या पासून पत्र लिहूनच जगतो

फूगेवाला

आई बघ गल्लित आपल्या आला आहे फूगेवाला
घेना सुंदर फुगा मला तु पैसे देऊन त्याला

गल्लिमधे फिरतो आहे तो सायकल वरून
समोर आणी मागे लावलेत फुगे हवा भरून

रंग आहेत छान बघण्या सारखे खास
दूरून बघता होई इन्द्रधनुश्याचा भास

गोल चपटा साधा सरळ तर कुठला आहे लांब
आवाज देऊन सांगतो त्याला घरा पुढे थांब

खेळीन मी त्या फुग्याशी दिवसभर घरात
पोचला आहे बघ तो अताच आपल्या दारात

आई बघ गल्लित आपल्या आला आहे फूगेवाला
घेना सुंदर फुगा मला तु पैसे देऊन त्याला

अल्बम...

पर्वा आमचं जाणं झालं एका मित्रा कडे
म्हटलं भेटुन घ्याव तुला आलोच होतो इकडे

त्यानी आम्हां दोघांनाही हसून आत बोलावलं
छान वाटलं आलास म्हणून स्मित हास्य टोलावलं

बयकोने त्याच्या लगेच मग केला गरम चहा
हातात देऊन जाड अल्बम बोलली फोटो पहा

बायको माझी हसत होती माझ्या कडे पाहून
म्हटलं केवढी चूक केली याच्या कडे येऊन

फोटो दाखवायला मग ती दोघं अशी काही भिडली
मिश्किल हसून बायको बोलली कशी अद्दल घडली

तास भर त्या दोघांनी खाल्लं माझं डोक
कळलं मला का येत नाहीत याच्या कडे लोकं

कसा तरी थाप मारून पडलो तिथून बाहेर
ह्याच्या पेक्शा फारच बरं बायकोचं माहेर