टोल फ्री

घरच्या माझ्या टीव्हीत झाला थोडा बिघाड
दुकानदाराने सांगितला टोल फ्री चा जुगाड

म्हणाला या शतकात सारं झालंय सोप
फोन करा घरी तुमच्या लगेच येतिल लोकं

देऊन त्याला धन्यवाद मी डायल केला नंबर
उत्तर आले व्यस्त सारे प्रयत्न करा नंतर

डायल केला दुसर्यांदा तर ऐकु आली टोन
अधिकारयाशी बोलण्या साठी दाबा नंबर दोन

दोन दाबताच पलिकडून आवाज आला दर्दी
करू आम्ही बिघाड दूर बोला तुमची अर्जी

म्हण्तलं माझा टीव्ही झाला आहे खराब
पाठवा माणसं लवकर घरी सारे नाराज

प्रश्न विचारून आठ दहा टोकन दिले मला
दोन दिवसात येतिल माणसं नाहीतर कॉल करा

बघता बघता वाट दोन हफ्ते गेलेत निघून
डायल करून नंबर सारखा बोट गेलित दुखुन

टीव्ही काही अजुन माझा दुरुस्त झाला नाही
टोल फ्री वाला अजुनही घरी आला नाही

घरचे जाऊन बसतात बघायला टीव्ही शेजारी
मी बसतो डायल करत टोल फ्री माघारी

आठवड्याचे वार

माणुस जगतो ओढत आपल्या आयुश्याचा भार
रुपं घेऊनी सोबत करिती आठवड्याचे वार

सोमवाचा दिवस पहिला नोकरीवर जाण्याचा
समोर दिसतो साचलेला उभा भार कामाचा

मंगळवारचा दिवस दूसरा बाजाराला जाण्याचा
सांगितलेले सारे हिने जे न विसरता घेण्याचा

बूधवारचा दिवस तिसरा आरामाचा आसतो
सवंगड्यांशी गप्पा मारीत टपरी वरती बसतो

गुरुवारचा दिवस चौथा देवतांच्या चरणी
उपास करुनी दर्शनास या पापभिरुची वर्णी

शुक्रवारचा दिवस पाचवा असतो सिनेमा बघण्याचा
नविन उमेद नविन आस घेऊन पुन्हा जगण्याचा

शनिवारचा दिवस सहावा दिवस बाहेर जाण्याचा
संध्याकाळी हिच्या संगे हॉटेल मधे खाण्याचा

रविवारचा दिवस सातवा दिवस असतो आळसाचा
सप्ताहाचा शेवट करीतो निरोप घेतो सर्वांचा

प्रेमाचा पाढा

हा पाढा लगेच पाठ होईल हं......

बे एके बे
भेटायल मला ये

बे दुने चार
प्रेम तु़झ्यावर फार

बे त्रिक सहा
डोळयात माझ्या पहा

बे चोक आठ
हातात घे हात

बे पंचे दहा
फुलला मोगरा पहा

बे सखे बारा
घरच्यांनी लावलाय पाहारा

बे साती चौदा
लव्ह यु म्हण एकदा

बे आठी सोळा
दुसरया कुणावर नको डोळा

बे नवे अठरा
ओळखिच्यांचा खत्रा

बे दाहे विस
उशिर झालाय निघते please

अपघात

मेला शेवटी तडफडत तो वॉर्ड बाहेर आज
वाटली नाही तरीही डॉक्टरांना लाज
शेवट पर्यंत मिळाली नाही त्याला एक खाट
तुटले होते अपघातात त्याचे दोन्ही हात

परवाच आणलं होत त्याला लोकांनी संध्याकाळी
ऊडवलं होत गाडीने तो चालला होता पायी
विनवणी करत होती आई तोंडात आणून फेस
डॉक्टर म्हणाले घेत नाही आम्ही पोलिस केस

तयार झाले कसे तरी प्राथमिक उपचार द्यायला
पैसे पेपर आणा आधी विचार करू मग घ्यायला
कुठून आणू पैसे येवढे पेच बापाला पडला
माणसा सारखा माणुस तो लाचार होऊन रडला

पोलिस वाले करत नव्हते पेपर लवकर तयार
मागत होते पैसे त्यांना करण्या एफ्.आय. आर
वाट पहात पहात शेवटी दिवस एक सरला
त्यान्चा एकुलता एक पोर पैस्या पुढे हरला

घडुन येवढ देखिल मनाला पाझर नाही फूटले
पैस्या ने हो त्या बघा माणुसकीला लुटले
मुक्त झाला आत्मा त्याचा सारं बघतो आहे
पैसे दिल्यावर मिळेल प्रेत ऐकून हस्तो आहे

सा रे ग म प

घरा घरातील लहान थोर सर्व प्रेक्षकांसाठी
सा रे गा मा प ची स्पर्धा घेऊन आली झी मराठी

सूर तालाचा सुंदर मेळ साप शिडीचा शेवटी खेळ
सुंदर सुंदर गाणे ऐकत मजेत जातो आपला वेळ

कारिते सुरूवात पल्लवी आपल्या बोलण्याने
परीक्षकांचे स्वागत होते मोठ्या जल्लोश्याने

वादयांचा मग घुमू लागतो सुंदर असा नाद
एक एक करूनी स्पर्धक येती मनास घालती साद

सरते शेवटी क्षण नकोसा साप शिडीचा येतो
जड मनाने एकाला मग निरोप आपण देतो

वोट कराहो राज्याची ती सीमा न बांधता
मान्यवरांच्या गाण्याने होते मग सांगता

निरोप घेतो आपण सारे पुन्हा भेटण्यासाठी
सप्त सुरांशी अश्याच जुळवण्या पुन्हा आपल्या गाठी

जमेल का तुला

मला पावसात भीजायला आवडतं तुला आवडत नाही
दर पावसाळ्यात हे असच होत
माझ्या मनातला ओलावा कधी दिसेल का तुला
माझ्या साठी जगणं जमेल का तुला

तु घरी नसलास कि मी अधिर होते भेटायला
तु येतोस आणी पुन्हा बाहेर जातोस
वेळ कधी मला देणं जमेल का तुला
माझ्या साठी जगणं जमेल का तुला

मी तुझ्या सोबत चालु पहतेय
तु मात्र शर्यतीत धवतोयस
सोबत माझ्या हरणं जमेल का तुला
माझ्या साठी जगणं जमेल का तुला

मी सर्वस्व्य सोडून तुझी होऊ पहाते
तु मात्र धावतो आहेस म्रुगजळाच्या मागे
मी जाण्या आधी हव ते भेटेल का तुला
माझ्या साठी जगणं जमेल का तुला

मी आहे...

जन्मास येतो रोज मी कुठल्या तरी कामानी
प्रवासाला होते सुरवात वेग वेगवेगळया नावांनी

वेग वेगवेगळी रुपं माझी वेग वेगळे प्रकार
काम करण्या कधिच नाही देत कुणाला नकार

पोटातच मी ठेवतो सारे सांगत नाही कोणाला
बंद असो वा उघडे तोंड जागतो मी वचनाला

कुणी भरतो धान्य माझ्यात कुणी भरतो रेती
कुणी नेतो पाठीवर अन कुणी ठेल्यावरती

कधी वाहून नेण्या वापरी कुणी मला हो कचरा
घाव सोसुनी सारे देखिल चेहरा नेहमी हसरा

घरा मधे दारा समोर नेहमिच माझी वर्णी
नमस्कार मी करतो प्रत्येकाच्या चर्णी

माळ्यावर मी कधी बसतो पोटात घालून भांडी
गरीबाच्याही कामी येतो वाजू लागता थन्डी

काय करणार कुणा कुणाचे असेच असतात भोग
"पोत्या" शिवाय काय कधी हे राहू शकतात लोक

हट्ट

नमस्कार करतो सर्वाना नाव माझे हट्ट
जन्मा पासुन सर्वानशी माझे नाते घट्ट
लहान पणी सारे जण काळजी माझी घेतात
बोबडे बोल मागतील ते लगेच आणुन देतात
इथेच बहुतेक सर्वाचे एकुण गणित चुकते
वाढत्या वायात जाता जाता माझी छाती फुगते
हळु हळु माझ्या मग मागण्या मी वाढवतो
अडुन बसतो सारे काही मनासारखे घडवतो
जेव्हा करीतो प्रवेश मी तरुणाईच्या घरात
करतो बरेच उपद्रव प्रत्येकाच्या घरात
कधी सत्ता कधी भत्ता मिळवण्याचा रचतो डाव
रुसवा फुगवा असती सोबत मनावरती देतो घाव
येवढ मात्र नक्कि आहे सोबत माझी कामाची
पेटुन उठलो कि घडवितो कामं मोठया नामाची
शांत असतो थोडा मी उतरणारया वयात
पहिले इतकी ताकद नसते थकलेल्या पायात
म्रुत्यूच्या मी जातो चरणी शेवटी आयुश्याच्या
प्रवास माझा असाच आसतो ठाई प्रतेकाच्या

वाट

रोज याच खिडकितुन बघतो वाट येण्याची
रंगवतो मी स्वप्न पुन्हा घरी जाण्याची
वाटलं नव्हतं माझ्या वरती असे दिवस येतिल
माझिच मुलं मला व्रुधाश्रमात नेतिल
ज्यांना जपलं फूला सारखं हाती काटे रुतवून
टाकुन गेलेत मलाच माझे सारे काही विसरुन
अस्ती ही जर सोबत तर वाट्ले नस्ते खरं
येवढे जड झालोत आपण सोडुन गेलित पोर
हीचा फोटो येतांना मी आठवणीनी आणला
तसा पण तो अडगळीच्या खोलित होता टांगला
किती दिवस गेलेत आता तेही आठवत नाही
फोटो सोबत बोलत बसतो काम नाही काही
आता फक्त म्रुत्युची त्या बघायची वाट
गेल्यावर मी या मुलांनो सरणा द्याया आग

मी एक कोडर....

मी एक कोडर हो मी एक कोडर
नोकरी मागु मागु घश्याला पडली कोरड

.NET, DB, Planning चे करु शकतो काम
मोबद्ल्यात मी घेईल वाजिब असे दाम

अनुभव आहे पाठिशी पण काम हाती नाही
recession चा बळी मी दोष नाही काही

दिवस असे वाईट पण करू तरी काय
मन माझं मानेल पण पोटाचे काय

चलतो आता जवळ आलाय interview चा थांबा
असेल कुठे नोकरी तर माझ्या साठी सांगा

गातो आहे

गातो आहे पुन्हा एकदा विरहाचे मी गीत
सोडुन गेली आजच मजला पुन्हा माझी प्रीत

वेळ पैसा सारे काही अमाप करितो खर्च
भेटण्यास ती मजला लागे कधी कधी हो वर्ष

रुसवे फूगवे सारे झेलतो फूलं मी देतो वेचून
तरीही ती का निघून जाते ह्रुदय माझे ठेचुन

करीतो नेहमी मेहनत येवढी मीळविण्या मी प्रीती
शेवटी हरतो विरहच ऊरतो खेळ खेळते नीयती

म्हणुनच गातो पुन्हा एकदा विरहाचे मी गीत
सोडुन गेली आजच मजला पुन्हा माझी प्रीत

सत्यम....

राजू राजू काय केलस
राजू राजू काय केलस

इतकी मोठी कंपनी आहे सत्यम
तुझ्या एका चुकीने झाली खतम
राजू राजू काय केलस
राजू राजू काय केलस

आता थोडा भरत होता बाजाराचा घाव
धाड धाड पाडलेस तू शेअर्स चे भाव
राजू राजू काय केलस
राजू राजू काय केलस

मयटास जर घेतली असतीस आधीच तू विकत
संकट नसते सर्वांवर आले एवढे बिकट
राजू राजू काय केलस
राजू राजू काय केलस

आता दोन महिन्यांचा मिळणार नाही पगार
५०० कोटी खाऊन तू झाला आहेस फरार
राजू राजू काय केलस
राजू राजू काय केलस

कविता पुराण

विचारले तीने मला अरे किती कविता करशील
शब्दांना असं तु कितीदा धारेवर धर्शिल
थकले आहेत स्सरे बघ तालवर तुझ्या नाचून
वाचकही दमलेत येवढ्या कविता वाचून

सकाळ दुपार संध्याकाळ कवितेशी तुझा खेळ
तुझ्यापाई आम्हा सरवांना लागायच वेड
कुठलाही विषय मिळाला की लगेच कागद भरतोस
जमली कि नाही वाच जरा म्हणुन समोर धरतोस

कर थोडा आराम सोड कवितेचा प्रांत
बघु नकोस आम्हां सर्वान्चा तु असा अंत
कवितेचे तुझे कागद जाळणार आहे मी आज
जनाची नाही तर मनाची आसावी माणसाला लाज

पाहिजे आहे तसे मग.....

अवधूत गुप्ते यांनी गायलेल्या "पाहिजे आहे तसे..." या गझल चे विडंबन केले आहे
सर्व जणांची माफी मागुन सादर करतो आहे

पाहिजे आहे तेव्हा गं तु मला सोडून जा
खर्च केला जो तुझ्यावर तो मला देऊन जा

एटीम होतो तुझा मी खर्च ते विसरू नकोस
बंद झाले खाते माझे ते पुन्हा उघडून जा

मी कसा बरबाद झालो हे विचारू ही नकोस
मी कधी आबाद होतो हे सुद्धा विसरून जा

मी नव्या शोधात आता चाललो आहे पुन्हा
शक्यतो तर माझ्या पासून लांब आता तु रहा

पाहिजे आहे तेव्हा गं तु मला सोडून जा
खर्च केला जो तुझ्यावर तो मला देऊन जा

देवा मला लवकर...

देवा मला रोज एक अपघात कर च्या धर्तिवर.....

देवा मला लवकर project allot कर
देवा मला लवकर project allot कर

दिवस आहेत recession चे
bench वर नको भर
देवा मला लवकर...

उद्या पर्वा कुठे तरी व्हावी एक Deal
नावावरती त्यातच माझ्या लागावे रे Seal
manager नी येऊन मला सांगावे तडक
देवा मला लवकर...

talent माझे bench वर नसावे खरे
काम मिळता मला पण वाटेल बरे
coding करण्या खर्चील मी डोकं दीवस भर
देवा मला लवकर...

खरी व्यथा देवा माझी माहित तुला
दोघं तीघं आधिच गेलेत सोडुन मला
विचार त्याचा करता डोक फिरे गर गर
देवा मला लवकर...

लागता कामा डोक्यावरचा कमी होईल भार
allowence चा त्यातच थोडा मिरेल आधार
recession नच काय मग tension ही विसर
देवा मला लवकर...

क्रेडीट कार्ड

रीसेशन चे दिवस होते जगणे होते हार्ड
त्यातच तीचा फोन आला घेता का हो कार्ड

तिच्या गोड बोलण्यात मी आसा काही फसलो
नको नको म्हण्ता म्हण्ता हो म्हणुन बसलो

मग काय तीने लगेच घेतला माझा पत्ता
वटलं होत स्वता: येईल पाठवुन दिला पोट्टा

हफ्त्या भरात त्यानी माझं नविन कार्ड धाडलं
पडंल हिच्या हातात आणी बजेट माझं वाढलं

बिल् त्याचे बघता कोरड पडली घश्याला
झळ त्याची आजुनही जाणवते खिश्याला

वचन दिलेले तुला

खोटं बोलतांना प्रत्येक वेळा जीव माझा तुटतो
ओले होतात काठ डोळयांचे म्हणुन मी ते मीटतो
वचन दिलेले तुला मी पावलो पावली मोडतो आहे
तु गेल्याचे कळू नये म्हणुन खोटं बोलतो आहे

दिवस रात्र त्याला फक्त तुझिच आठवण येते
नियती ही बघ कशी आपली परिक्षा घेते
स्वप्नातही रोज म्हणे तुच त्याच्या येतेस
भरवते त्याला हाताने आणी फिरायला नेतेस

त्याच्या समोर जायची आता वाटते मला भिती
कारण किती सांगु त्याला खोटं बोलु किती
अजब आहे इश्वरा खरच तुझी खेळी
सांगु कस त्याला त्याची आई आहे गेली