आपली माणंसं

आले होते जे इथे निघून गेलेत सारे
पुन्हा एकदा उरलोय मी आणि खिडकी दारे

ते येतात तेंव्हा या भिंती होतात घर
ते जातात तेंव्हा मात्र एकटेपणात भर

एकट आता जगण्याची सवय झालीय मला
खोडं मात्र काढल्याशिवाय रहावत नाही तुला

ते येतात तेंव्हा मी पण थोडं जगून घेतो
आपली माणंसं कशी असतात ते बघून घेतो