स्टॉप

ती दिसेल का उभी मला पुन्हा त्या स्टॉप ला
उभा होतो काल जिथे जाण्यासाठी क्लास ला

नीळा आकाशी ड्रेस तिने केला होता परिधान
बघुन तीला माझ्यातल्या प्रेमाला आले उधाण

अधे मधे वळुन ती बघत होती लोकांना
हळुच मागे करत होती डोळ्यांनवरील बटांना

बघत होती वाट कुठल्या बसची ते कळत नव्हतं
जवळ नव्हतो तिच्या म्हणून माझं मन जळत होत

तेवढ्यात कुठुन एक बस येउन तिथे थांबली
होणारी आमुची पहिली भेट होता होता लांबली

फसले आधी कुणी ?

हसले आधी कुणी ? तु का मी ? च्या धरतिवर आधारित.....(चित्रपट - मोलकरीण)

फसले आधी कुणी ? तु का मी ?

शेअर थोडे घेऊन मी पाहिले
पैसे त्यासाठी बरेच वाहिले
शेअरचे त्या भाव वाढता
बोनस त्यावर मजला मीळता

फसले आधी कुणी ? तु का मी ?

मन्दिचे मग वारे वाहता
भाव पडले पहाता पहाता
सारे माझे ते गणीत चुकता
हातचे सारे घलवुन बसता

फसले आधी कुणी ? तु का मी ?

काडीमोड

त्या दोघांच इतक्यात भांडणं आहे वाढलं
काही तरी वेगळ आहे मध्यंतरी घडलं
पहीले कशी दोघं सुखात होती नांदत
ऊगाच खोटं नाटं कधी तरी भांडत

लोकं पण लगेच कुजबूज लागतात करायला
त्यांच्या बद्दल नको ते लागतात बोलायला
म्हणे तो गेला आहे दारुच्या आहारी
ती म्हणे आज काल अस्ते जास्त माहेरी

खरं काय ते त्यातलं माहित नाही कोणाला
जातं काय नको ते कयास लावायला
विचारू का जाऊन तीला काय असं घडलं
मधेच असं काय त्यांच्यात बिघडलं

पण नकोच ती मला भोचक म्हणेल
उगाच चार चौघात ईभ्रत काढेल
कुणास ठाऊक दोघं आशी का लागलित वागायला
नजर लागली कुणाची त्यांच्या संसाराला

शेवटी काल मला कळली खरी बातमी
करीयर साठी केली त्यांनी संसाराची वाटणी
काडीमोड घेऊन ते जाणार आपापल्या मार्गावर
संसाराची गाडी कधी चालते का एका चाकावर

रस्त्यावरचा वेडा

तो रोज मला दिसतो वेडसर चाळे करतांना
इकडून तिकडे रस्त्यावर वेडा वाकडा फिरतांना
कधी करतो हात वारे कधी स्वतशी बडबड
डोळे रूक्ष पाहता वाढे हृदयाची हो धडधड

वाढलेले केस फाटके कपडे आणी रंग काळा
येता जाता त्यास चिडवणे हाच लोकांना चाळा
पण त्याला चिडवलं की तो अगदी शांत बसतो
किती वेडा आहात तुम्ही अविर्भावात या हसतो

उरलं सुरलं घरा घरातल मिळत त्याला खायला
फुटकी बाटली असतेच जवळ थोड पाणी प्यायला
सोबत असते नेहमीच त्याच्या एक छोटे गाठोडे
येता जाता बघतोय त्याला गेले कित्येक आठवडे

रात्री येऊन पोलीस वाले मजा त्याची घेतात
उचलून त्याचे सामान दूर फेकून देतात
ते गेल्यावर मग तो बडबड करतो थोडा
जीवन असेच जगतो तो रस्त्यावरचा वेडा

वेदना

येणार कुणी कळलं की तयार होऊन बसते
मनात असतो राग तरी ओठातुन हसते

आई सकाळ पासून देवाला घालते साकडे
लोकांचे होते सहज सोपे आमचेच का रे वाकडे

नाही एकाला आवडली तर दुसरा जातो बघून
शोभेची होते वस्तू मी लाज शरम टाकून

या आधी बरेचदा बघणे बोलणे झाले
कुणी दिलेत नकार कुणाचे निरोप नाही आलेत

बघून गेलेत लोक की माझी धक धक वाढते
म्हणूनच मी घरच्यांकडे बघायचे टाळते

होकार मिळावा यंदा तरी येवढिच मनात भावना
समजेल का कूणाला माझ्या मनातील वेदना

स्वपान

काय सांगु लोकहो मले स्वपान काल एक पडलं
किस्सा सांगतो तुम्हाले त्यात काय काय घडलं
मेलो होतो म्या अन पोचलो होतो स्वर्गात
बसलो होतो जाऊन श्यान बापुजींच्या वर्गात

बापू तेथ शिकवत व्हते सर्वांस्नि गांधिगीरी
म्या म्हन्ल घ्यावी शिकून वापरू कधीतरी
बापू नी मग सांगितला त्यायिचा मन्त्र
म्हने याच मन्त्राने दूर केले पारतंत्र

नंतर मले बापूंनी जवळ आपल्या बोलावलं
ऐकून दश्या देशाची मन त्याईच हेलावल
म्या म्हन्ल बापूजी सारं एपरीत घडताय
रोज मरतात कितीक लोक कुठ कोन रडताय

देशात सर्वि कडे वाढलि अराजकता
झोपली हाय देशातली तरी बघा सत्ता
कोनिबि येतो आनी गोळ्या घालुन निघुन जातो
मन्त्रि म्हन्तो थांम्बा जरा कापडं बदलून येतो

ऐकून बापू बोलले विसर म्या जे शिकवलं
भेटुन मुक्ति ह्या गड्यांनी पारतंत्रच टिकवलं
गांधिगीरी तुझ्या काही येनार नाही कामी
मंत्रि जेथ सहज बनतो गुंडा एक नामी

अनाथ

आज ति दोघं येणार आहेत न्यायला
बाईंनी सांगितल आहे मला तयार रहायला

काही दिवसांन पुर्वि ते इथे आले होते
घेऊन जातील मलाच स्वप्नातही वाटले नव्हते

कागदावरती ते आहेत अगदी चांगले माय बाप
खरं काय ते कळेल गेल्यावरच नशिबात

मी काय करू मी आहे एक अनाथ
उकिरडा मीळालाय मला जन्मताच आन्दणात

कधी बाईंना मी खचलेले पाहिले नव्हते
आई नसून देखिल त्यांचे डोळे पाणावले होते

तिचं माझं

तिच माझं बोलणं आधी सारख होत नही
कुर कुर असते तिची तू दखल माझी घेत नाही

सकाळी मला ऑफिस तिला स्वयंपाकाची अस्ते घाई
कळता कळत नही इतक्या लवकर वेळ निघुन जाई

दुपारी करावा फोन तर तिला नस्तो वेळ
म्हण्ते बघते आहे मी सिरीयल थोड वेळ

संद्याकाळी नेमक काम साहेबाच निघतं
बोलण राहत बाजूला घड्याळ तेवढ दिसतं

घरी येताच बाकी सारे दत्त म्हणुन हजर
शोधत राहते तिलाच माझी वेडी नजर

मोबाईल

घेतो घेतो करता करता घेतला मी मोबाईल
वाटलं बाकी गड्यांन सारखी मारु थोडी स्टाईल
कंपनी होती चांगली आणि हॅन्डसेट होता झकास
चेहर्या वरती आनंद पण खिसा मात्र भकास
रिंगटोन म्हणूण सेट केलं देवाचं मी गाणं
हल्लि रोज होत नाही मंदिरात आपलं जाणं
थोडं घाबरत हळुच डायल केला पहिला नंबर
पलिकडुन आवाज आला बोलतो गणेश प्लंबर
सॉरी रॉग नंबर म्हणून फोन केला कट
खुणवत होते सर्व हा किती बावळट
हळू हळू मोबाईल काय चीज आहे कळलं
खिश्या मधून कागद पेन त्यानी मात्र गाळलं

पोपट

तिची माझी भेट अशी आचानकच घडली
पडत होता पाऊस होती छत्री खाली द्डली

तेवढ्यात कुठून एक वीज आशी कडाडली
सुंदर अशी काया तिची हळूच शहारली

तिच्या सुंदर चेहरया वरून ओघळत होते पाणी
पहात आहेत तिलाच सारे आलं माझ्या ध्यानी

फोन तेवढ्यात खणखणला तन्द्रि तुटली माझी
बायको होती सांगत तीकडून घेऊन या हो भाजी

बाबा मला

बाबा घरी आज लवकर येशील काय ?
फिरायला मला तू बाहेर नेशील काय ?

घरी मी कुणालाही त्रास देणार नाही
खाऊसाठी उगाच ह्ट्ट करणार नाही

संध्याकाळी आई मला तयार करून देईल
ती पण फिरायला आपल्या सोबत्त येईल

तिघे मिळून आपण जाउ तळ्याच्या काठी
जत्रा जिथे रोजच भरते छोट्या मोठ्या साठी

तिघे आपण मस्त मारू भेळीवर ताव
वेळ होता घेऊ मग घराकडे धाव

रात्री आई सुंदर अशी गोष्ट मला सांगेल
संध्याकाळ अशी बघ सुंदर आपली रगेल

मग बाबा घरी आज लवकर येशील काय ?
फिरायला मला तू बाहेर नेशील काय ?

गाण्याची सीडी

बाबा मला गाण्याची आण एक सीडी
माकड मारेल उड्या ज्यात ससा चढेल शिडी

असायला हवी त्यात सस्याची गोष्ट
गेला झोपी झाला जो कासवा कडून पस्त

भोलनाथ सांगेल ज्यात हलवून मान
मिळेल कुणाला मनातले दान

चॉचलेटच्या बंगल्यात सर्वांची सभा
बोलायला असेल सर्वांना मुभा

बाबा मला अशी एक आण तु सीडी
माकड मारेल उड्या ज्यात ससा चढेल शिडी

चारोळी

सरता सरता सरले अजुन एक वर्ष
नव वर्षाच्या स्वागतात नाही काही हर्ष

चांगले वाईट बरेच काही यामधे घडले
शौर्याचे ते मरण पाहता मुंबईकर ही रडले

नव वर्षाच्या नव्या सकाळी घेऊ एकच ध्यास
ठेचून काढू त्यांना जे करतील असा प्रयास

############++++++++++############

नवरया मागे बायको धावते सकाळ संध्याकाळ
खर्च करवते नको तेवढा जाते तिचे रे काय

काय तीच्या रे मनात दडले नकळे कधी कुणा
आवाज चढता लगेच काढे ती रे आपल फणा

############++++++++++############

कधी इकडे कधी तिकडे बॉम्ब एक फुट्टो
कुण्या एक संसाराचा धागा मधेच तुट्टो

करतं हे जे कुणी त्याला जात नाही धर्म
काय होतं साध्य त्यांना करता अशी कर्म