स्वर कुणाचा आज येतो कापरा कानावरी
भैरवी गातो कुणी हा कोणत्या तालावरी
शब्द सारे टोचणारे घाव या हृदयावरी
दाटूनी येतो गळा जेंव्हा तुला मी आठवी

असचं.....

तुझं माझं प्रेम कुणापासून लपलं नाही
म्हणुनच का ते कुणालाही रुचलं नाही
++++++++++++++++++++++++++
आयुष्याच्या वाटेवर बरं वाईट सारचं घडलं
शेवटी मात्र दोघांनाहि आपलं मी पण नडलं
++++++++++++++++++++++++++
घड्याळ्याचे काटे फिरतात काळ मात्र थांबला आहे
वाट तुझी पाहण्यात वसंतही लांबला आहे
++++++++++++++++++++++++++
मार्ग तुझा माझा वेगळा बोलुन सखे निघून गेलिस
नकळत येउन बोचणारी एक आठवण ठेउन गेलिस
++++++++++++++++++++++++++
आठवण तुझी आली की मनं प्याला भरतं
शेवटी दोघं रितेच हे त्याला देखिल कळतं

मी एक पक्षी

मी एक पक्षी ... पंख नसलेला
सिमेंटच्या घरट्यात अडकून बसलेला

ईच्छा कितिही असली तरी उडणं मला शक्य नाही
पटकन मिळतील पंख असा जादुचा मंत्र नाही
कसा उडून जाउ सांगा प्रपंच आहे मागे
कितिही नकार दिला तरी जुडले आहेत धागे

बरं नुस्ती झेप घेउन थोडिच काही होणाराय
घरट्यातल्या पिल्लांनकडे लक्श्य कोण देणाराय
म्हणुन आता सर्व सोडून घरटं पक्कं करतोय
पंख मिळे पर्यंत मी जमिनिवरच चालतोय

असा मी एक पक्षी ... पंख नसलेला
सिमेंटच्या घरट्यात अडकून बसलेला

एक गरम चहा

मी आणि मित्र माझा, एक गरम चहा
आयुष्यातला गुंता सारा दूर करतो पहा

सौ जेव्हा माझी कधी भडकते माझ्यावर
प्रेमच राहिलं नाही तुझं म्हण्ते घरी गेल्यावर
एक चहाचा गरम कप मी आणुन देतो तिला
म्हण्तो विसर सारं काही साडी घेऊया तुला

आई वडील जेव्हा माझे येतात माझ्या घरी
घरतलं भांड कधी न रहालाय वाजल्या परी
लगेच सर्वांसाठी मी करतो गरम चहा
म्हणतो सिरीयल टिव्हिच्या थोड्या कमी पहा

कामावरून बॉस जेव्हा ऑफिसातला भडकतो
सुट्टी मला देण्यावरून तो जेव्हा अडकतो
मगवतो मी त्याच्यासाठी एक गरम चहा
म्हण्तो काम सारं करतो सुट्टीच ते पहा

चौकातला मामा जेव्हा सिग्नल साठी अडवतो
चलान साठी त्रास देउन उगाच मला नडवतो
त्याला सुधा देतो मी खर्च चहा पाण्याचा
तुम्ही काय मी काय मार्ग एकच जाण्याचा

कुणास ठाऊक कसा पण हा मित्र आहे खरा
अडकलेली कामे लावतो मार्गी भरा भरा
विश्वास नसेल बसत तर करून तुम्ही पहा

चिऊ आणि काऊ

एक होती चिऊ, एक होता काऊ
एक होती चिऊ, एक होता काऊ
म्हणाले सोबत बाजाराला जाऊ

चिऊ नि घेतल्या पिशव्या दोन
म्हणाली आणखिन येताय कोण
काऊ नी काढली गाडी लगेच
म्हणाला आपण जाउया दोघेच

पोचले दोघे पण बाजारात
ऐकून भाव पडले विचारात
काऊ ला तर फूटला लगेच घाम
येवढ्याश्या भाजिला क इतका दाम

चिऊ नि घेतला पावभर भोपळा
खिसा झाला लगेच मोकळा
काऊ नि घेतले भरताचे वांगे
म्हणाला खायिल सर्वांन सन्गे

चिऊ ने मग विचारला बटाट्याचा भाव
म्हणाली पावभरच तुम्हि द्या राव
काऊ नि घेतले काकडी आणी मुळे
म्हणाला कोशिंबीर चांगली जुळेल

परतिला दोघे निघले मग
चिऊ म्हणाली थकले बघ
म्हणाला काऊ घेउ उसाचा रस
नाही तर घेउया सरबत खस

दोघेही पोचले वापस घरी
म्हणाले मजा आली खरी
एक होती चिऊ, एक होता काऊ
म्हणाले सोबत बाजाराला जाऊ

बाबा मला...

बाबा मला नको सांगूस गोष्ट उडत्या पाखरांची
नको गाऊस अंगाई निजणारया वासरांची

तु मला फक्त सांग मी कशी जींकु लढाई
काहिच मिळत नाही फक्त करून पढाई

म्हणू नकोस तु हे नाही आहे खरं
बोलण्या पुरतच सारं हे वाटतं बरं

रोज पहातो मी तुला तिच लढाई लढतांना
अपयशाचे घाव सोसून घायाळ होऊन फिरतांना

मला देखिल आता पासुन तयारी हवी करायला
भल्या भल्यांना लाविन मी मैदान सोडुन पळायला

बरेच दिवस

बरेच दिवस झाले होते कविता कुठली लिहून
पडली होती वही तशिच अर्धी कविता घेऊन

आज मात्र अगदी सहज दोन शब्द सुचले
अर्ध्या माझ्या कवितेला ते बघा रुचले

सारं कसं मोजून मापून ताला सुरात बसलं
भरलेलं ते वहिचं पान पुन्हा पुन्हा हसलं

आपली माणंसं

आले होते जे इथे निघून गेलेत सारे
पुन्हा एकदा उरलोय मी आणि खिडकी दारे

ते येतात तेंव्हा या भिंती होतात घर
ते जातात तेंव्हा मात्र एकटेपणात भर

एकट आता जगण्याची सवय झालीय मला
खोडं मात्र काढल्याशिवाय रहावत नाही तुला

ते येतात तेंव्हा मी पण थोडं जगून घेतो
आपली माणंसं कशी असतात ते बघून घेतो

डायरी

तिचं माझ्यावरचं प्रेम एक प्रेमळ शायरी
बरच काही सांगून गेली मला तिची डायरी

आवरतांना कपाट माझ्या अलगद लागली हाती
प्रत्येक पान पुन्हा एकदा जगवून गेलं नाती

सुंदर कोरीव अक्षरांनी भरली होती पानं
शब्दात शब्द गंफून तिने मांडलं होत गाणं

वाचता एक एक पान हरपलं माझं भान
उभी होती येऊन मागे आलच नाही ध्यान

हरुच ठेऊन खांद्यावर हात पुटपुटली कानात
अरे वेड्या मी नसतांना हीच येईल कामात

गुलमोहर

अंगणातला गुलमोहर पाहता पाहता सुकाला
तुझा त्याला भेटण्याचा नियम जसा तुटला

तू गेलिस त्या दिवशी तो बहरला होता वेडा
तुझा पार्थीवावर त्याचाच घातला होता सडा

माहीत होता मला खूप आवडतो तो तुला
म्हणूनच जातानाही दिला तुझ्या सोबतीला

तू गेल्याचे कसे कळले त्याला समजत नाही
पण त्यावर आता एकही फूल उमलत नाही

एकदा वाटलं मुळासकट फेकून द्यावा उपटून
पण तोच तर करून देतो आठवण तुझी हटकून..

निरोप

गेले काही दिवस मी एक नियम पाळतो आहे
तिच्या घराकडे जाण्याचे टाळतो आहे

कारण तिला बघित्तल की जुने दिवस आठवतात
पुन्हा पुन्हा तिच्या घरा कडे पाठवतात

काही दिवसान पूर्वीच तिने निरोप दिलाय मला
म्हणाली होती आता अशी भेटणार नाही तुला

घरच्यांनी आपल ठरवला आहे लग्न
चांगलं दिसत नाही आपल अस वागणं

तुझ्या माझ्या लग्नाला दिवस उरलेत कमी
लवकरच तू माझा होणार आहेस धनी

आठवण

का सांजवेळी आज होती तुझेच भास
आवळती मनाला का आठवणींचे फास

बाहेर अंगणात बरसून गेला मेघ
हलकेच गालावरती ओघळली पहा रेघ

हे घर झाले मूक ना बोले बघ काही
जगणे माझे उदासिन ते मूकपणे पाही

गेलिस एकट्याला तु सोडुन का ग येथे
सोबतिला तुझ्याही कोणी नको का तेथे..

निवडणुक

मंत्री रुपी गिधाडं पुन्हा दिसू लागलेत
मतं मिळविण्यासाठी सावज शोधू लागलेत
शरिरावर चढवून खादीचा बूरखा
बेशरम हे दाखवत आहे बघा पुळका

सत्ते साठि सारे हात मिळवणी करतात
सत्ता आलि कि सारे काही विसरतात
कुणि वाटटो आहे पैसे तर कुणि देतोय भाषणं
कधि होणार सुटका आपली कुणास ठाउक यातन

आता यांना राम रहिम सारे बघा आठवतात
मुद्दा बनवून त्याचा हे लोकांना बाटवतात
कुणि म्हणतोय आम्हिच आहोत मित्र तुमचे खरे
बाकि म्हणतात जाउ दे सारे डावेच आहेत बरे

स्वताह भोवती लावुन झेड ग्रेड सेक्युरिटी
देणार आहेत म्हणे हे पिसफूल लोकॅलिटी
खरं काय खोटं काय बरंच आपण जाणतो
तरी का मग नेहमी आपसात भांडतो

या वेळेला देण्याआधी मत करा विचार
बघू नका कोण कसा करतो आहे प्रचार
निवडणुकीच्या रिंगणात आहेत सारेच भ्रष्ट
निवडा त्याला ज्याच्या साठी हा देश श्रेष्ठ

वाट तिची

नेहमीच तिला पहायचो मी इथून जातांना
माळण्यासाठी केसात सुंदर गजरा घेतांना

गजरा घेउन हातात ती अलगद माळायची
तिची ती अदा मला नेहमिच भावायची

तिला रोज बघण्याचे वेड मला लागले
वाट पहात तिची माझे स्वप्नही जागले

मित्र मला तिचा वेडा म्हणू लागले
झलके साठी एका सारे काही त्यागले

ती मात्र यायची आणि जायची निघून
मी घ्यायचो उसासे नुसताच बघून

नंतर काही दिवस ती दिसेनासी झाली
गजरा घ्यायला आपल्या नवर्यासोबत आली

माझ्या प्रियेला

प्रेमाचे गीत मी गात चाललो
माझ्या प्रियेला मनवित चाललो

ठरली होति भेट काल
बॉसनी माझ्या केले हाल
कामात पुरता अडकून राहिलो
माझ्या प्रियेला मनवित चाललो

वाट पाहिली तिने फार
फोने केलेत दोन चार
मी मात्र फक्त वेळ पहात राहिलो
माझ्या प्रियेला मनवित चाललो

हाति देउन फूल कधि
कधि पकडून उगिच कान
तिची क्षमा मी मागत चाललो
माझ्या प्रियेला मनवित चाललो

प्रेमाचे गीत मी गात चाललो
माझ्या प्रियेला मनवित चाललो

बेवडा

मी दिसलो कि बघा बेवडा आला म्हंणतात
लोकं माझ्याबद्दल काय वाटेल ते बोलतात

अपघातत गमवली मी बायको आणि मुल
आठवण त्यांची आजही घेतेय माझा सूड

देउन तेव्हा सांन्तवना गेला होतत निघून
कधी तरी विचारलत का मला तुम्ही मागून

विसरु नका भरल होता तुम्हिच पहिला प्याला
बोलल होतात थोडी याची गरज आहे याला

बोलण्यात तुमच्या येउन चुक जी मी केली
तिच मला कायमची बेवडा बनवून गेली

दारू शिवाय सांगा मी आता कसा राहू
हवि होती जेव्हा साथ कुठे होता भाऊ

फिरकी (मागणी भाग दुसरा !!)

आवडलं नाही मित्रा मला तुझं असं वागणं
बागेत भेटून अचानक असं मागणी घालणं

सारे करतात तिच चुक तुही का रे केलिस?
खरी खुरी मैत्री आपली प्रेमावर का नेलिस?

वाटलं होत मला तु एक मित्र आहेस चांगला
का रे असं वेड्यासारखा तु आज वागलास

तुझ्याकडुन नव्हती मला खरचं अशी अपेक्षा
मागणी घालुन केलिस तु मैत्रिचि उपेक्षा

किती गर्व होता मला मैत्रिवर माझ्या
सारं काही तु बघ संपवलस राज्या

बोलणं माझं ऐकून तुला आली असेल गिरकी
आवडतो रे तुही मला मी घेत होते फिरकी

मागणं फक्त येवढच आहे दे खरी साथ
कितिही वादळं आलित तरी सोडु नकोस हाथ

मागणी

आज तिला माझ्या मनातलं मी सांगणार
आयुष्यभरासाठी मी साथ तिची मागणार

बोलावलं आहे तिला मी भेटायला बागेत
होतिल गप्पा पुन्हा नेहमिच्या जागेत

तिला द्यायला घेतलं आहे फूल एक गुलाबी
विचारेल माझ्या सारखच वाटतं का तुलाही

मनात थोडी भिती आहे खरं खरं सान्गतो
नकार मिळाला तर काय? यावरच मी थांबतो

पण शेवटी मला हे विचारावच लागणार
दूसरं कोणी येण्याची मी वाट थोडिच बघणार

होकार नकार जे काय असेल कबूल असेल मला
सांगतो नंतर काय घडलं भेटुन येतो तिला

पिंक स्लीप...

काल संध्याकाळी मी दिली तिला ring
का ग देत नाहिस तु याहूवरती ping
सतत आपल status असत तुझं offline
चुक झाली काही कि केलस मला sideline

ती बोलली सध्या वाढलं आहे काम
deadlines ने सर्वांना पिडलं आहे जाम
chatting mailing सारं आहे सध्या बंद
timepass करणार्याला PM देतो दंड

pink slip चे सध्या वहात आहेत वारे
ज्यांच्या कडे काम त्यांचे वारे न्यारे
office मधे सारे जण tension मधेच असतात
मिळेल ते काम निमूट करत बसतात

मला पण वाटतं दोन शब्द बोलवे
कामाचे हे पाश थोडे तरी तोडवे
पण समोर दिसताच डोर्यांच्या pink slip चा रंग
तोडुन टाकते मी मोहावणारे बंध