एक गरम चहा

मी आणि मित्र माझा, एक गरम चहा
आयुष्यातला गुंता सारा दूर करतो पहा

सौ जेव्हा माझी कधी भडकते माझ्यावर
प्रेमच राहिलं नाही तुझं म्हण्ते घरी गेल्यावर
एक चहाचा गरम कप मी आणुन देतो तिला
म्हण्तो विसर सारं काही साडी घेऊया तुला

आई वडील जेव्हा माझे येतात माझ्या घरी
घरतलं भांड कधी न रहालाय वाजल्या परी
लगेच सर्वांसाठी मी करतो गरम चहा
म्हणतो सिरीयल टिव्हिच्या थोड्या कमी पहा

कामावरून बॉस जेव्हा ऑफिसातला भडकतो
सुट्टी मला देण्यावरून तो जेव्हा अडकतो
मगवतो मी त्याच्यासाठी एक गरम चहा
म्हण्तो काम सारं करतो सुट्टीच ते पहा

चौकातला मामा जेव्हा सिग्नल साठी अडवतो
चलान साठी त्रास देउन उगाच मला नडवतो
त्याला सुधा देतो मी खर्च चहा पाण्याचा
तुम्ही काय मी काय मार्ग एकच जाण्याचा

कुणास ठाऊक कसा पण हा मित्र आहे खरा
अडकलेली कामे लावतो मार्गी भरा भरा
विश्वास नसेल बसत तर करून तुम्ही पहा

चिऊ आणि काऊ

एक होती चिऊ, एक होता काऊ
एक होती चिऊ, एक होता काऊ
म्हणाले सोबत बाजाराला जाऊ

चिऊ नि घेतल्या पिशव्या दोन
म्हणाली आणखिन येताय कोण
काऊ नी काढली गाडी लगेच
म्हणाला आपण जाउया दोघेच

पोचले दोघे पण बाजारात
ऐकून भाव पडले विचारात
काऊ ला तर फूटला लगेच घाम
येवढ्याश्या भाजिला क इतका दाम

चिऊ नि घेतला पावभर भोपळा
खिसा झाला लगेच मोकळा
काऊ नि घेतले भरताचे वांगे
म्हणाला खायिल सर्वांन सन्गे

चिऊ ने मग विचारला बटाट्याचा भाव
म्हणाली पावभरच तुम्हि द्या राव
काऊ नि घेतले काकडी आणी मुळे
म्हणाला कोशिंबीर चांगली जुळेल

परतिला दोघे निघले मग
चिऊ म्हणाली थकले बघ
म्हणाला काऊ घेउ उसाचा रस
नाही तर घेउया सरबत खस

दोघेही पोचले वापस घरी
म्हणाले मजा आली खरी
एक होती चिऊ, एक होता काऊ
म्हणाले सोबत बाजाराला जाऊ

बाबा मला...

बाबा मला नको सांगूस गोष्ट उडत्या पाखरांची
नको गाऊस अंगाई निजणारया वासरांची

तु मला फक्त सांग मी कशी जींकु लढाई
काहिच मिळत नाही फक्त करून पढाई

म्हणू नकोस तु हे नाही आहे खरं
बोलण्या पुरतच सारं हे वाटतं बरं

रोज पहातो मी तुला तिच लढाई लढतांना
अपयशाचे घाव सोसून घायाळ होऊन फिरतांना

मला देखिल आता पासुन तयारी हवी करायला
भल्या भल्यांना लाविन मी मैदान सोडुन पळायला

बरेच दिवस

बरेच दिवस झाले होते कविता कुठली लिहून
पडली होती वही तशिच अर्धी कविता घेऊन

आज मात्र अगदी सहज दोन शब्द सुचले
अर्ध्या माझ्या कवितेला ते बघा रुचले

सारं कसं मोजून मापून ताला सुरात बसलं
भरलेलं ते वहिचं पान पुन्हा पुन्हा हसलं

आपली माणंसं

आले होते जे इथे निघून गेलेत सारे
पुन्हा एकदा उरलोय मी आणि खिडकी दारे

ते येतात तेंव्हा या भिंती होतात घर
ते जातात तेंव्हा मात्र एकटेपणात भर

एकट आता जगण्याची सवय झालीय मला
खोडं मात्र काढल्याशिवाय रहावत नाही तुला

ते येतात तेंव्हा मी पण थोडं जगून घेतो
आपली माणंसं कशी असतात ते बघून घेतो