स्वपान

काय सांगु लोकहो मले स्वपान काल एक पडलं
किस्सा सांगतो तुम्हाले त्यात काय काय घडलं
मेलो होतो म्या अन पोचलो होतो स्वर्गात
बसलो होतो जाऊन श्यान बापुजींच्या वर्गात

बापू तेथ शिकवत व्हते सर्वांस्नि गांधिगीरी
म्या म्हन्ल घ्यावी शिकून वापरू कधीतरी
बापू नी मग सांगितला त्यायिचा मन्त्र
म्हने याच मन्त्राने दूर केले पारतंत्र

नंतर मले बापूंनी जवळ आपल्या बोलावलं
ऐकून दश्या देशाची मन त्याईच हेलावल
म्या म्हन्ल बापूजी सारं एपरीत घडताय
रोज मरतात कितीक लोक कुठ कोन रडताय

देशात सर्वि कडे वाढलि अराजकता
झोपली हाय देशातली तरी बघा सत्ता
कोनिबि येतो आनी गोळ्या घालुन निघुन जातो
मन्त्रि म्हन्तो थांम्बा जरा कापडं बदलून येतो

ऐकून बापू बोलले विसर म्या जे शिकवलं
भेटुन मुक्ति ह्या गड्यांनी पारतंत्रच टिकवलं
गांधिगीरी तुझ्या काही येनार नाही कामी
मंत्रि जेथ सहज बनतो गुंडा एक नामी

No comments: