बाबा मला

बाबा घरी आज लवकर येशील काय ?
फिरायला मला तू बाहेर नेशील काय ?

घरी मी कुणालाही त्रास देणार नाही
खाऊसाठी उगाच ह्ट्ट करणार नाही

संध्याकाळी आई मला तयार करून देईल
ती पण फिरायला आपल्या सोबत्त येईल

तिघे मिळून आपण जाउ तळ्याच्या काठी
जत्रा जिथे रोजच भरते छोट्या मोठ्या साठी

तिघे आपण मस्त मारू भेळीवर ताव
वेळ होता घेऊ मग घराकडे धाव

रात्री आई सुंदर अशी गोष्ट मला सांगेल
संध्याकाळ अशी बघ सुंदर आपली रगेल

मग बाबा घरी आज लवकर येशील काय ?
फिरायला मला तू बाहेर नेशील काय ?

2 comments:

Anonymous said...

khup chan JD, tu tar mahol karun rahila aahe
Anirudha Gijare

Anonymous said...

Avadali. khup chhan ani ladival kavita.