वेदना

येणार कुणी कळलं की तयार होऊन बसते
मनात असतो राग तरी ओठातुन हसते

आई सकाळ पासून देवाला घालते साकडे
लोकांचे होते सहज सोपे आमचेच का रे वाकडे

नाही एकाला आवडली तर दुसरा जातो बघून
शोभेची होते वस्तू मी लाज शरम टाकून

या आधी बरेचदा बघणे बोलणे झाले
कुणी दिलेत नकार कुणाचे निरोप नाही आलेत

बघून गेलेत लोक की माझी धक धक वाढते
म्हणूनच मी घरच्यांकडे बघायचे टाळते

होकार मिळावा यंदा तरी येवढिच मनात भावना
समजेल का कूणाला माझ्या मनातील वेदना

No comments: