वचन दिलेले तुला

खोटं बोलतांना प्रत्येक वेळा जीव माझा तुटतो
ओले होतात काठ डोळयांचे म्हणुन मी ते मीटतो
वचन दिलेले तुला मी पावलो पावली मोडतो आहे
तु गेल्याचे कळू नये म्हणुन खोटं बोलतो आहे

दिवस रात्र त्याला फक्त तुझिच आठवण येते
नियती ही बघ कशी आपली परिक्षा घेते
स्वप्नातही रोज म्हणे तुच त्याच्या येतेस
भरवते त्याला हाताने आणी फिरायला नेतेस

त्याच्या समोर जायची आता वाटते मला भिती
कारण किती सांगु त्याला खोटं बोलु किती
अजब आहे इश्वरा खरच तुझी खेळी
सांगु कस त्याला त्याची आई आहे गेली

No comments: