आठवड्याचे वार

माणुस जगतो ओढत आपल्या आयुश्याचा भार
रुपं घेऊनी सोबत करिती आठवड्याचे वार

सोमवाचा दिवस पहिला नोकरीवर जाण्याचा
समोर दिसतो साचलेला उभा भार कामाचा

मंगळवारचा दिवस दूसरा बाजाराला जाण्याचा
सांगितलेले सारे हिने जे न विसरता घेण्याचा

बूधवारचा दिवस तिसरा आरामाचा आसतो
सवंगड्यांशी गप्पा मारीत टपरी वरती बसतो

गुरुवारचा दिवस चौथा देवतांच्या चरणी
उपास करुनी दर्शनास या पापभिरुची वर्णी

शुक्रवारचा दिवस पाचवा असतो सिनेमा बघण्याचा
नविन उमेद नविन आस घेऊन पुन्हा जगण्याचा

शनिवारचा दिवस सहावा दिवस बाहेर जाण्याचा
संध्याकाळी हिच्या संगे हॉटेल मधे खाण्याचा

रविवारचा दिवस सातवा दिवस असतो आळसाचा
सप्ताहाचा शेवट करीतो निरोप घेतो सर्वांचा

No comments: