मी आहे...

जन्मास येतो रोज मी कुठल्या तरी कामानी
प्रवासाला होते सुरवात वेग वेगवेगळया नावांनी

वेग वेगवेगळी रुपं माझी वेग वेगळे प्रकार
काम करण्या कधिच नाही देत कुणाला नकार

पोटातच मी ठेवतो सारे सांगत नाही कोणाला
बंद असो वा उघडे तोंड जागतो मी वचनाला

कुणी भरतो धान्य माझ्यात कुणी भरतो रेती
कुणी नेतो पाठीवर अन कुणी ठेल्यावरती

कधी वाहून नेण्या वापरी कुणी मला हो कचरा
घाव सोसुनी सारे देखिल चेहरा नेहमी हसरा

घरा मधे दारा समोर नेहमिच माझी वर्णी
नमस्कार मी करतो प्रत्येकाच्या चर्णी

माळ्यावर मी कधी बसतो पोटात घालून भांडी
गरीबाच्याही कामी येतो वाजू लागता थन्डी

काय करणार कुणा कुणाचे असेच असतात भोग
"पोत्या" शिवाय काय कधी हे राहू शकतात लोक

No comments: