बलात्कार

उभी आहे ती कोर्टात मिळविण्यासाठी न्याय
अन्याय झालाय तिच्यावर दोष तिचा हो काय

बाप मेल्यावर लागली नोकरीत त्याचा जागी
घरी भावंडे दोन लहान आणी म्हातरी आजी

एकटं हेरून तीला त्याने साधला होता डाव
करून बलात्कार तिच्यावर दिला न बुझंणारा घाव

आरोपीच्या कठड्यात तो नराधम आहे उभा
पैसेवाल्यांना का असते काहिही करण्याची मुभा

वकिल मात्र तिलाच विचारतोय नेमकं काय घडलं
त्याने केलं सारं की तुमचं पाऊल वाकड पडलं

घडलेलं सारं काही ती ओरडुन ओरडुन सांगतेय
स्वातच आपली ईभ्रत ती वेशिवरती टांगतेय

आठवलं सारं की आजुनही लटपटतात तिचे पाय
मिळेल का तिला खरच तिच्या मनासारखा न्याय?

No comments: