ए. टी. एम

भेट माझी घेण्यासाठी असावं लागतं कार्ड
पैसे घेणं माझ्या कडून नाही जास्त हार्ड

आजकाल जागोजागी मी असतो हजार
सर्व गरजू लोकांची माझ्यावरती नजर

नाव जरी वेगळं तरी एकच आहे काम
मागाल तेंव्हा देतो मी तुम्हाला दाम

गरजू आपलं कार्ड माझ्या फटिमधे टाकतो
चेहर्यावरचे माझ्या काही नियम वाचतो

पुढे करतो नंतर मी पीन कोडच कोडं
चेक करण्या त्याला थांब म्हणतो थोडं

चुक झाली तीनदा तर कार्ड गिळुन टाकतो
चोरी करू नये कुणी म्हणुन असा वागतो

बरोबर असेल पिन तर पुढचा मेनु देतो
किती हवेत पैसे तुम्हाला हे विचारून घेतो

ओके असेल सारं तर मोजतो लगेच नोटा
सेवा माझी घेण्यात नाही काही तोटा

दुसर्या फटितून मी मग पैसे बाहेर टाकतो
भेदभाव न करता मी असाच नेहमी वागतो

मला भेट देणारा होतो नेहमी धनी
ए. टी. एम आहे मी मला वापरलाय ला तुम्ही

No comments: